Tuesday, April 2, 2019

आरमोरी विधानसभा मतदारसंघात सहाय्यकारी मतदान केंद्र --- गडचिरोली विधानसभा मतदारसंघात 3 मतदान केंद्रांत बदल


                                                        महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालयगडचिरोली,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती  विभागनागपूर
दूरध्वनी - 222194, फॅक्स   - 222718                   E-Maildiogadchiroli@gmail.com                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                   

वृ.क्र  174                                                                                               दि:02 एप्रिल 2019

12-गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ
       आरमोरी विधानसभा मतदारसंघात  सहाय्यकारी मतदान केंद्र
      गडचिरोली विधानसभा मतदारसंघात 3 मतदान केंद्रांत बदल
गडचिरोली दि 02 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता सहाय्यकारी मतदान केंद्राच्या प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. 
        सहाय्यकारी मतदान केंद्र- 67 आरमोरी  विधानसभा मतदार संघ-
अ.क्र.
मतदान केंद्राचे नाव व मतदान केंद्र
मतदान केंद्रांचा पत्ता
मतदान केंद्र प्रकार
1
33- कुरखेडा
जि.प.उच्चश्रेणी प्राथमिक केंद्र शाळा कुरखेडा खोली क्रमांक 1
मुळ मतदान केंद्र
2
33 अ- कुरखेडा
जि.प.उच्चश्रेणी प्राथमिक केंद्र शाळा कुरखेडा खोली क्रमांक 3
सहाय्यकारी मतदान केंद्र
3
67- कोरची
जि.प.उच्चश्रेणी प्राथमिक केंद्र शाळा कोरची खोली क्रमांक 2
मुळ मतदान केंद्र
4
67 अ- कोरची
जि.प.उच्चश्रेणी प्राथमिक केंद्र शाळा कोरची खोली क्रमांक 3
सहाय्यकारी मतदान केंद्र
5
110- देसाईगंज (तुकूम वाडी)
नगर परिषद नगर भवन, फवारा चौक, चौकीदार क्वार्टर  मागील बाजू देसाईगंज
मुळ मतदान केंद्र
6
110 अ- देसाईगंज (तुकूम वाडी)
नगर परिषद नगर भवन, फवारा चौक, चौकीदार क्वार्टर  मागील बाजू देसाईगंज
सहाय्यकारी मतदान केंद्र
7
115- देसाईगंज(किदवाई वाडी)
न.प. मराठी प्राथमिक शाळा देसाईगंज (नवीन इमारत) भगतसिंग वार्ड, खोली क्रमांक -2
मुळ मतदान केंद्र
8
115 अ - देसाईगंज(किदवाई वाडी)
न.प. मराठी प्राथमिक शाळा देसाईगंज (नवीन इमारत) भगतसिंग वार्ड, खोली क्रमांक -3
सहाय्यकारी मतदान केंद्र
9
119 देसाईगंज (वडसावाडी)
न.प. मराठी प्राथमिक शाळा देसाईगंज, जुनी वडसा खोली क्रमांक -1
मुळ मतदान केंद्र
10
119 अ -देसाईगंज (वडसावाडी)
न.प. मराठी प्राथमिक शाळा देसाईगंज, जुनी वडसा खोली क्रमांक -2
सहाय्यकारी मतदान केंद्र
68- गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदान संघ
इमारत बदल झालेल्या मतदान केंद्रांची यादी
अ.क्र.
यादी भाग क्रमांक
मतदान केंद्राचा पुर्वीचा पत्ता
मतदान कंद्रांचा नवीन पत्ता
79-
79-गडचिरोली
नगरपरिषद प्राथमिक शाळा, लांझेडा, गडचिरोली, खोली क्रमांक 3
अंगणवाडी केंद्र क्रमांक -7 लांजेडा वार्ड
80-
80-गडचिरोली
नगरपरिषद प्राथमिक शाळा, लांझेडा, गडचिरोली, खोली क्रमांक 4
अंगणवाडी केंद्र क्रमांक -210 लांजेडा वार्ड
306-
306- वायगाव रै.
जिल्हा परिषद उच्च प्राथमि शाळा, वायगाव, रै.
ग्रामपंचायत कार्यालय, वायगाव
                                                ******

आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्‍याबदल 6 गुन्‍हे दाखल


12-गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ
आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्‍याबदल 6 गुन्‍हे दाखल
गडचिरोली दि 02 : आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्याच्या  
दृष्टीने आचारसंहिता अंमलबजावणी पथकाचेगठन करण्यात आले आहेजिल्हास्तरीय आचारसंहिता पथक जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याबद्दल कार्यवाहीकरित आहेदिनांक 01 एप्रिल 2019 पर्यंत आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याबद्दल 6 गुन्हे दाखल झाले आहेत.
यामध्‍ये एमसीसी 24 पथके, स्‍टॅटीक सर्व्‍हेलन्‍स पथक 39, भरारी पथके 26, चेकपोस्‍टस 33 असून एमसीसी पथकाला आचारसंहिता भंग केल्‍याची प्रकरणे आढळून आली आहेत. या सर्व प्रकरणामध्‍ये कार्यवाही करण्‍यात आली असून एफआयआर ही दाखल करण्‍यात आलेले आहेत. निवडणुक खर्च संनियंत्रण पथक व पेडन्‍युज संदर्भातील एमसीएमसी अंतर्गत अद्याप प्रकरणे दाखल झालेले नाहीत.

-----000-----

उमेदवार व राजकीय पक्षांच्या खर्चावर खर्च संनियंत्रण कक्षाची करडी नजर -- दैनंदिन खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर करण्याचे उमेवारांना निर्देश


वृ.क्र  172                                                                        दि:02 एप्रिल 2019
उमेदवार व राजकीय पक्षांच्या खर्चावर
खर्च संनियंत्रण कक्षाची करडी नजर
दैनंदिन खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर करण्याचे उमेवारांना निर्देश

गडचिरोली, दि.02 –: लोकसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च संनियंत्रण कक्षाची करडी नजर आहे. प्रत्येक खर्चाचा तपशील कक्षाला कळविणे बंधनकारक आहे.          
उमेदवाराने आपल्या खर्चाचे दैनंदिन लेखे विहीत नमुन्यात ठेवणेउमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी कोणतीही सभा अथवा पदयात्रेची परवानगी मागताना संभाव्य खर्चाचा आराखडा सादर करणे आवश्यक आहे. प्रचार साहित्यावर फक्त विशिष्ट पक्षाचे चिन्ह असेल तर असा खर्च त्या संबंधित पक्षाच्या खर्चामध्ये समाविष्ट केला जाईल. परंतु जर प्रचार साहित्यावर उमेदवाराचा फोटोनाव असेल तर तो खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाईल. उमेदवाराचे स्वत:चे मालकीचे वाहन असेल तर अशा वाहनाचा फक्त इंधन व चालकाचा खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाईल. मात्रउमेदवारांच्या इतर वाहनांचा खर्च त्यावर घोषित केलेल्या दराप्रमाणे उमेदवारांना द्यावा लागणार आहे. त्याची नोंद खर्च संनियंत्रण कक्षाकडे द्यावी लागणार आहे.
दैनंदिन  खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर करण्याचे उमेवारांना निर्देश
                निवडणूक खर्च संनियंत्रण सारसंग्रह फेब्रुवारी 2019 अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 77 अन्वेय उमेदवाराने नामनिर्देशन दाखल केल्याचा दिनांक व निकाल जाहिर झाल्याचा दिनांक या दरम्यानच्या कालावधीतील निवडणूकविषयक सर्व खर्चाच्या नोंदी निवडणूक निणर्य अधिकारी यांच्याकडुन प्राप्त झालेल्या जोडपत्र ई-1 मध्ये हिशेब ठेवणे आवश्यक आहे.
            उमेदवार अथवा त्यांचे निवडणुकविषयक प्रतिनिधी यांनी ठेवण्यात आलेली दैनंदिन खर्च नोंदवही निवडणुक प्रचार मोहिमेच्या कालावधीत किमान तीन वेळा खर्च निरिक्षक यांचेकडे तपासणीकरीता सादर करावयाची आहे.त्यानुसार 12- गडचिरोली - चिमूर या सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2019 करीता उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी दिनांक 1 एप्रिल 2019,दिनांक 5 एप्रिल 2019 व दिनांक 9 एप्रिल 2019 रोजी सकाळी 10.00 ते सांयकाळी 5.00 वाजेपर्यत आपल्याकडील दैनंदिन खर्च नोंदवही,मुळ देयके व प्रमाणक तसेच खर्चाच्या वर्णनाची संक्षिप्त टिपणीसह निश्चित केलेल्या दिनांक व वेळेस खर्च निरिक्षक यांचकडे सादर करावीत.
            तसेच जे उमेदवार खर्चविषयक लेखे विहीत कालावधीत सादर करण्यास कसुर करतील त्यांचेविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 चे कलम 10 क व भारतीय दंड संहिता(IPC) 1860 मधील कलम 171  (I)  नुसार कारवाई करण्यात येईल.निवडणुक खर्चाची नोंदवही लेखे तपासणी करतांना लोक उपस्थित राहु शकतील आणि निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्येक पृष्ठाला 1 रुपया प्रमाणे रक्कम प्रदान केल्यावर कोणत्याही व्यक्तीला,कोणत्याही उमेदवारांच्या नोंदवहिची प्रत मिळविता येऊ शकेल.असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.
उमेदवारांने त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीचे सर्व तपशील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविणे आवश्यक असून निवडणुकीचा खर्च निकालाच्या दिवसापर्यंत गणला जाईल. पेड न्यूजसंदर्भात इलेक्ट्रॅानिक तसेच मुद्रित माध्यमे, स्थानिक केबल नेटवर्क तसेच फेसबुक, ट्विटर, बल्क एसएमएस यासारख्या माध्यमांवरही विशेष लक्ष दिले जात आहे.
                                                -----000-----

सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची टक्‍केवारी वाढणे गरजेचे - जिल्‍हाधिकारी शेखर सिंह


वृ.क्र  171                                                                                                 दि:02 एप्रिल 2019

सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची टक्‍केवारी वाढणे गरजेचे
                                                - जिल्‍हाधिकारी शेखर सिंह

गडचिरोली, दि.02 – मतदारांनी जात, धर्म आर्थिक प्रलोभन किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता मतदान करावे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची टक्‍केवारी वाढणे गरजेचे असल्‍याचे जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
जिल्‍हाधिकारी शेखर सिंह म्‍हणाले, मतदारांनी मोठया संख्‍येने मतदान करावे यावर तसेच महिला, युवक, आणि अपंग यांचा मतदानातील सहभाग वाढविण्‍यात भर देण्‍यात येत आहे. मतदान केंद्राच्‍या ठिकाणी अपंगांसाठी रॅम्‍पची सुविधा असणार आहे. 
मतदान हा मतदारांचा हक्‍कही आहे तसेच ते कर्तव्‍यही आहे. मतदानाची टक्‍केवारी वाढावी यासाठी जनजागृती कार्यक्रम घेण्‍यात आला आहेत. या अभियानांतर्गत विविध प्रकारच्‍या स्‍पर्धाचे तसेच रॅली, पथनाट्याचेही आयोजन करण्‍यात येत आहे.
                                      -----000-----

राज्यात सि-व्हिजील ॲपवर १ हजार ८६२ तक्रारी दाखल


राज्यात सि-व्हिजील ॲपवर १ हजार ८६२ तक्रारी दाखल
 गडचिरोली दि 2 : राज्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करता यावी आणि नागरिकांना देखील या संदर्भात तक्रारी दाखल करण्यात याव्यात या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने सि-व्हिजील (cVIGIL) हे मोबाईल ॲप उपलब्ध करुन दिले आहे. या ॲपवर आतापर्यंत एकूण 1 हजार 862 तक्रारी नागरिकांकडून दाखल करण्यात आल्या आहेत. या संदर्भात जिल्हास्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांनी दिली.
निवडणुकीमध्ये मतदारांना निर्भय व मुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याअंतर्गत पोलीस, आयकर, अबकारी विभाग इत्यादी विभागांमार्फत निगराणी ठेवण्यात येत आहे. या विभागांनी आतापर्यंत 19.82 कोटी रुपये इतकी रोख रक्कम, 38.36 कोटी रुपये इतक्या किमतीचे सोने व इतर जवाहिर, 13.64 कोटी रुपये इतक्या किमतीची दारु, 3.96 कोटी रुपये इतक्या किमतीचे मादक पदार्थ याप्रमाणे एकूण 75.79 कोटी रुपये इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निवडणुकीचे काम आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आणि संबंधित कायदा व नियमांनुसार पार पाडण्यात येत आहे, हे पाहण्याकरिता आयोगाकडून प्रत्येक लोकसभा मतदार संघाकरिता विविध निरीक्षक  नेमण्यात येत आहेत, अशी माहितीही श्री.मोहोड यांनी दिली.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सात मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून यात वर्धा मतदारसंघात 14, रामटेकमध्ये 16, नागपूरमध्ये 30, भंडारा-गोंदिया मध्ये 14, गडचिरोली-चिमूरमध्ये 5, चंद्रपूरमध्ये 13 तर यवतमाळ-वाशिममध्ये 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.                                           *******

संपर्क क्रांती, निवडणूक आणि 1950


संपर्क क्रांतीनिवडणूक आणि 1950

            डिजिटल युगातील मध्यावधी निवडणूक म्हणून यंदाची निवडणूक ओळखली जात आहेएक प्रकारे ॲप च्या मदतीने होणारी ही या स्वरुपाची पहिली निवडणूक आहे असेही म्हणता येईलसोबतच मतदारांसाठी देण्यात आलेल्या 1950 या टोल फ्री क्रमांकालाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
            जगात मोबाईलचा शोध लागल्यानंतर प्रथम केवळ मोबाईल ते मोबाईलवर बोलण्यास सुरुवात झाली त्यानंतर मोबाईल ते लॅडलाईन संपर्क सुरु झाला.
            मोबाईल क्रांतीचे अनेक टप्पे आपणास सांगता येतील याचे पहिलं रुप पेजर आपण बघितलं.  तो एकतर्फी संदेश देण्याचा यशस्वी प्रयत्न ठरला त्यानंतर मोबाईलमध्ये आलेल्या शॉर्ट मेसेजिंग सर्व्हीस अर्थात एसएमएस ने त्याची जागा घेतली यात खऱ्या अर्थाने संवाद सुरु झाला होता.
            मोबाईल एस.एम.एसवरुन मल्टीमिडीया संदेश अर्थात एम.एम.एसकडे वळला यात सचित्र संदेशाची सोय होती.  नंतरच्या काळात आलेल्या व्हॉटस अप सारख्या नव्या संवाद माध्यमांनी या दोन्ही सेवा संपवल्याव्हॉटसअपवर बिनाखर्चाचे संदेश पाठवणे शक्य होतेव्हॉटसअप भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय झाले.त्यानंतर भारतात असणारी तत्कालीन क्रमांक एकची कंपनी बी.एस.एन.एल ने अधिकृतरित्या MMS सेवा बंद करण्याची अधिकृत घोषणा केली.
            काही गोष्टी कालपरत्वे बदलत जातात.  त्या काळाच्या ओघात कोणेकाळी सर्वाधिक महत्वाची यंत्रणा टेलिग्राम लोप पावली असे बदल तंत्रज्ञानाच्या शोधासमवेत घडत जातात.
            मोबाईलवर कॉल करणे खर्चिक होत अशा मुळातच बुध्दीमान असणाऱ्या भारतीयांनी त्याच मोबाईलवर 'मिसड्कॉलचा शोध लावलायात खर्च शून्य होता.  'तू घरुन निघालास की एक मिसकॉल देहा संवाद हमखास ऐकायला मिळतो
            2001 साली अमिताभ बच्चनची 'कौन बनेगा करोडपतीही मालिका प्रथम छोट्या पडद्यावर आलीत्यावेळी SMS ला पैसे लागायचे आता त्याच्या ताज्या मालिकेत या एसएमएस ची जागा 'ॲपनेघेतलेली आपणास दिसली                                                                                                 
            पैसे कमीत कमी खर्च करण्याची भारतीयांची मानसिकता लक्षात घेवून विविध कंपन्यांनी याच काळात टोल फ्री क्रमांकाची संकल्पना आणली आणि झटपट लोकप्रिय झाली.  एक पैसा खर्च न करता सेवा प्राप्त करणे माहिती मिळविणे इथवर आपण पोहोचलो आहोत.
            भारतात लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव असणाऱ्या या मध्यावधी सार्वत्रिक निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाने देखील 1950 हा असाच टोल फ्री क्रमांक कोट्यावधी मतदारांना उपलब्ध करुन दिला आहे.
            1950 या क्रमांकावर संपर्क साधून मतदारांना मतदार यादीतील आपला क्रमांकप्रभागमतदान केंद्र आदीची माहिती झटपट मिळत आहे.  त्यामुळे या क्रमांकावर येणाऱ्या कॉल्सची संख्या दिवसागणीक वाढत आहेसंख्या वाढली याचा अर्थ मतदार आता जागरुक झाला आहे असा होतोत्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे हे देखील स्पष्टच आहे.
            या व्यतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र याच्या कार्यालयास अविरत अर्थात 24X7 माहिती देणारे दोन क्रमांक सुरु करण्यात आलेले आहेत. 022-22040451 आणि 022-22040454 हे ते दोन क्रमांक आहेत.  मतदारांपर्यत माहिती पोहचवण्यासाठी आयोग व जिल्ह्यामधील यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.याला प्रतिसादही मिळत आहे त्यामुळे यंदा मतदानाची टक्केवारी वाढेल याबाबत आशा निर्माण झाल्या आहेत......


                                                                                                     (प्रशांत दैठणकर)
                                                                                                जिल्हा माहिती अधिकारी,

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल