gadchiroliloksabhanews2019.blogspot.com
Thursday, May 23, 2019
12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे अशोक नेते विजयी
वृ.क्र
265 दिनांक: 24 मे 2019 (रात्री 2.00 वाजता)
12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.)
लोकसभा मतदारसंघ निवडणूकीत
भारतीय जनता पार्टीचे अशोक
नेते विजयी
गडचिरोली,दि.24: 12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.)
लोकसभा मतदारसंघ निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे अशोक महादेवराव नेते हे विजयी झाले आहेत. त्यांना एकूण
519968 मते प्राप्त झाली.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी असे घोषित केले.
शासकीय कृषी महाविद्यालयात
मतमोजणी प्रक्रिया झाली. अन्य उमेदवारांना प्राप्त मते -डॉ. नामदेव दल्लुजी
उसेंडी- काँग्रेस - 442442,
हरीचंद्र नागोजी मंगाम- बहुजन समाज पार्टी - 28104, देवराव मोनबा नन्नावरे- आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया- 16117, डॉ. रमेशकुमार गजबे- वंचित बहुजन आघाडी- 111468. यापैंकी कुणीही नाही
(नोटा)- 24599.
विधानसभा क्षेत्रनिहाय
प्राप्त मते खालील प्रमाणे -
|
विधानसभा क्षेत्र
|
अशोक महादेवराव नेते
|
डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी
|
हरीचंद्र नागोजी मंगाम
|
देवराव मोनबा नन्नावरे
|
डॉ. रमेश कुमार गजबे
|
नोटा
|
एकूण
|
|
66- आमगाव
|
94630
|
76109
|
4228
|
1325
|
2628
|
2550
|
181470
|
|
67- आरमोरी
|
89511
|
72369
|
4292
|
2923
|
12794
|
4114
|
186003
|
|
68- गडचिरोली
|
102942
|
79203
|
4889
|
3744
|
11778
|
5263
|
207819
|
|
69- अहेरी
|
63908
|
70142
|
6748
|
5120
|
5264
|
6983
|
158165
|
|
73- ब्रम्हपुरी
|
89361
|
76849
|
4205
|
1358
|
27283
|
2521
|
201577
|
|
74- चिमुर
|
77370
|
65714
|
3644
|
1620
|
50989
|
2987
|
202324
|
|
टपाली मते
|
2246
|
2056
|
98
|
27
|
732
|
181
|
6376
|
|
एकूण
|
519968
|
442442
|
28104
|
16117
|
111468
|
24599
|
1143734
|
नाकारण्यात आलेली मते 1036
आहेत, तर प्रदत्त मते 2 असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
*****
Tuesday, May 21, 2019
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी
केली मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी
- मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याचे निर्देश
- पोलिस बंदोबस्त व अन्य व्यवस्थांचा घेतला आढावा
गडचिरोली, दि.20: 12- गडचिरोली - चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीच्या मतमोजणीच्या ठिकाणास निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक डॉ. मोहित गर्ग, अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, दामोधर नान्हे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी कल्पना नीळ तसेच संबंधीत नोडल अधिकारी उपस्थित होते.
मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी.मतमोजणीसाठी नियुक्त नोडल अधिकारी तसेच त्यांच्या पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतमोजणीच्या अनुषंगाने दिलेल्या जबाबदारीची सविस्तर माहिती करुन घ्यावी, व आपली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडून मतमोजणीची प्रक्रिया यशस्वी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारीसिंह यांनी टपाली मतपत्रिका मोजणी पथक, मतमोजणी मनुष्यबळ व्यवस्थापन पथक, साहित्य व्यवस्थापन पथक, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे सहाय्यक पथक,सिलींग पथक, मतमोजणी समन्वय व अहवाल संकलन पथक या पथकांचा सविस्तर आढावा घेऊन सूचना केल्या. त्याप्रमाणेच मतमोजणीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त,आरोग्य सुविधा, इंटरनेट सुविधा, मिडिया कक्ष, याबाबतही माहिती घेऊन संबंधित नोडल अधिकाऱ्यांना जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्याचे निर्देश दिले. मतमोजणी केंद्रात मतमोजणीच्या दिवशी मोबाईल वापरण्यास भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रतिबंध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीची मतमोजणी 23 मे रोजी सकाळी 8 वाजतापासून कृषी महाविद्यालय येथे होणार आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय 84 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 800 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी कृषी महाविद्यालयातील दोन मजल्यांचा वापर करण्यात येणार आहे. जवळपास प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीच्या 25 फेऱ्या अपेक्षित आहेत. कमीतकमी वेळेत मतमोजणीच्या फेऱ्या व्हाव्यात, यासाठी पोस्टल व बायलेट मतमोजणीसाठी स्वतंत्र कर्मचारी असतील अशी माहिती यावेळी देण्यात आली.
-----000-----
Wednesday, April 17, 2019
जिल्हयात 37(1)(3) कलम जारी
वृ.क्र : 217 दि:15 एप्रिल 2019
जिल्हयात 37(1)(3) कलम जारी
गडचिरोली,दि.15:- गडचिरोली
जिल्हयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 चे अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागु आहे. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन या पार्श्वभुमिवर
या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली
जिल्हयात 26 एप्रिल 2019 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम , 1951 चे कलम 37 (1) (3) लागु करण्यात
आलेले आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या
दृष्टीने विवक्षित कृतीना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध करण्यासंदर्भातील
निर्देश आहेत.
या कालावधीत शस्त्र, सोटे, तलवारी,
भाले, दंडे, बंदुका,
सुरे, काठया किंवा लाठया किंवा शारिरीक इजा
करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही
वस्तु बरोबर नेणे, कोणताही
दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर
क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने
बाळगणे, किंवा जमाकरणे, तयार करणे यावर
प्रतिबंध घालण्यात आले आहे. राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये
उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे किवा अशी चित्रे,
चिन्हे, फलक किंवा इतर कोणतेही जिनस किंवा
वस्तु तयार करणे किंवा प्रसार करणार नाहीत. पोलिस विभागाच्या पुर्व परवानगीशिवाय
कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक
जागेत, सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर 26 एप्रिल 2019 पर्यंत च्या 24 वाजेपर्यंत कोणीही जमा होणार नाहीत. हे कलम
गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागु राहतील असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, गडचिरोली
यांनी आदेशीत केले आहे.
*****
Monday, April 15, 2019
12-गडचिरोली-चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात 71.98 टक्के मतदान
वृ.क्र : 218
12-गडचिरोली-चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात
71.98 टक्के मतदान
गडचिरोली दि 15-: 12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 71.98 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.
12 गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान
67-आरमोरी,
पुरुष मतदार-127398
महिला मतदार-124647
इतर मतदार-0
एकूण मतदार- 252045
पुरुष- झालेले मतदान -94440 (74.13)
महिला- झालेले मतदान-91563 (73.46)
इतर- झालेले मतदान-0
एकूण- झालेले मतदान- 186003 (73.80)
68-गडचिरोली
पुरुष मतदार-145511
महिला मतदार-139646
इतर मतदार-0
एकूण मतदार- 285157
पुरुष- झालेले मतदान -107024 (73.55)
महिला- झालेले मतदान-100795 (72.18)
इतर- झालेले मतदान-0
एकूण- झालेले मतदान- 207819 (72.88)
69-अहेरी,
पुरुष मतदार-119334
महिला मतदार-116544
इतर मतदार-2
एकूण मतदार- 235880
पुरुष- झालेले मतदान -82393 (69.04)
महिला- झालेले मतदान-75713 (64.97)
इतर- झालेले मतदान- 1 (50.00)
एकूण- झालेले मतदान- 158107 (67.03)
66-आमगाव
पुरुष मतदार-132529
महिला मतदार-131683
इतर मतदार-0
एकूण मतदार- 264212
पुरुष- झालेले मतदान -90683 (68.43)
महिला- झालेले मतदान-90787 (68.94)
इतर- झालेले मतदान-0
एकूण- झालेले मतदान- 181470 (68.68)
73- ब्रम्हपूरी
पुरुष मतदार-135265
महिला मतदार-132569
इतर मतदार-0
एकूण मतदार- 267834
पुरुष- झालेले मतदान -102200 (75.56)
महिला- झालेले मतदान- 99377 (74.96)
इतर- झालेले मतदान-0
एकूण- झालेले मतदान- 201577 (75.26)
74- चिमुर
पुरुष मतदार-139710
महिला मतदार-135231
इतर मतदार-1
एकूण मतदार- 274942
पुरुष- झालेले मतदान -103550 (74.12)
महिला- झालेले मतदान-98770 (73.04)
इतर- झालेले मतदान-0
एकूण- झालेले मतदान- 202320 (73.59)
एकुण:
एकूण पुरुष मतदार-799747
एकूण महिला मतदार- 780320
एकूण इतर मतदार-03
एकूण मतदार- 1580070
पुरुष- एकूण झालेले मतदान - 580290 (72.56)
महिला- एकूण झालेले मतदान-557005 (71.38)
इतर- एकूण झालेले मतदान- 1 (33.33)
एकूण- झालेले मतदान- 1137296 (71.98)
*******
Subscribe to:
Posts (Atom)
12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल
12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल
