वृ.क्र 171 दि:02 एप्रिल 2019
सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे
गडचिरोली, दि.02 – मतदारांनी जात, धर्म , आर्थिक प्रलोभन किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता मतदान करावे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, मतदारांनी मोठया संख्येने मतदान करावे यावर तसेच महिला, युवक, आणि अपंग यांचा मतदानातील सहभाग वाढविण्यात भर देण्यात येत आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी अपंगांसाठी रॅम्पची सुविधा असणार आहे.
मतदान हा मतदारांचा हक्कही आहे तसेच ते कर्तव्यही आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला आहेत. या अभियानांतर्गत विविध प्रकारच्या स्पर्धाचे तसेच रॅली, पथनाट्याचेही आयोजन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment