| ||
आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याबदल 6 गुन्हे दाखल
गडचिरोली दि 02 : आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्याच्या
दृष्टीने आचारसंहिता अंमलबजावणी पथकाचेगठन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय आचारसंहिता पथक जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याबद्दल कार्यवाहीकरित आहे. दिनांक 01 एप्रिल 2019 पर्यंत आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याबद्दल 6 गुन्हे दाखल झाले आहेत.
यामध्ये एमसीसी 24 पथके, स्टॅटीक सर्व्हेलन्स पथक 39, भरारी पथके 26, चेकपोस्टस 33 असून एमसीसी पथकाला आचारसंहिता भंग केल्याची 6 प्रकरणे आढळून आली आहेत. या सर्व प्रकरणामध्ये कार्यवाही करण्यात आली असून एफआयआर ही दाखल करण्यात आलेले आहेत. निवडणुक खर्च संनियंत्रण पथक व पेडन्युज संदर्भातील एमसीएमसी अंतर्गत अद्याप प्रकरणे दाखल झालेले नाहीत.
-----000-----
No comments:
Post a Comment