वृ.क्र 172 दि:02 एप्रिल 2019
उमेदवार व राजकीय पक्षांच्या खर्चावर
खर्च संनियंत्रण कक्षाची करडी नजर
दैनंदिन खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर करण्याचे उमेवारांना निर्देश
गडचिरोली, दि.02 –: लोकसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च संनियंत्रण कक्षाची करडी नजर आहे. प्रत्येक खर्चाचा तपशील कक्षाला कळविणे बंधनकारक आहे.
उमेदवाराने आपल्या खर्चाचे दैनंदिन लेखे विहीत नमुन्यात ठेवणे, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी कोणतीही सभा अथवा पदयात्रेची परवानगी मागताना संभाव्य खर्चाचा आराखडा सादर करणे आवश्यक आहे. प्रचार साहित्यावर फक्त विशिष्ट पक्षाचे चिन्ह असेल तर असा खर्च त्या संबंधित पक्षाच्या खर्चामध्ये समाविष्ट केला जाईल. परंतु जर प्रचार साहित्यावर उमेदवाराचा फोटो, नाव असेल तर तो खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाईल. उमेदवाराचे स्वत:चे मालकीचे वाहन असेल तर अशा वाहनाचा फक्त इंधन व चालकाचा खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाईल. मात्र, उमेदवारांच्या इतर वाहनांचा खर्च त्यावर घोषित केलेल्या दराप्रमाणे उमेदवारांना द्यावा लागणार आहे. त्याची नोंद खर्च संनियंत्रण कक्षाकडे द्यावी लागणार आहे.
दैनंदिन खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर करण्याचे उमेवारांना निर्देश
निवडणूक खर्च संनियंत्रण सारसंग्रह फेब्रुवारी 2019 अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 77 अन्वेय उमेदवाराने नामनिर्देशन दाखल केल्याचा दिनांक व निकाल जाहिर झाल्याचा दिनांक या दरम्यानच्या कालावधीतील निवडणूकविषयक सर्व खर्चाच्या नोंदी निवडणूक निणर्य अधिकारी यांच्याकडुन प्राप्त झालेल्या जोडपत्र ई-1 मध्ये हिशेब ठेवणे आवश्यक आहे.
उमेदवार अथवा त्यांचे निवडणुकविषयक प्रतिनिधी यांनी ठेवण्यात आलेली दैनंदिन खर्च नोंदवही निवडणुक प्रचार मोहिमेच्या कालावधीत किमान तीन वेळा खर्च निरिक्षक यांचेकडे तपासणीकरीता सादर करावयाची आहे.त्यानुसार 12- गडचिरोली - चिमूर या सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2019 करीता उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी दिनांक 1 एप्रिल 2019,दिनांक 5 एप्रिल 2019 व दिनांक 9 एप्रिल 2019 रोजी सकाळी 10.00 ते सांयकाळी 5.00 वाजेपर्यत आपल्याकडील दैनंदिन खर्च नोंदवही,मुळ देयके व प्रमाणक तसेच खर्चाच्या वर्णनाची संक्षिप्त टिपणीसह निश्चित केलेल्या दिनांक व वेळेस खर्च निरिक्षक यांचकडे सादर करावीत.
तसेच जे उमेदवार खर्चविषयक लेखे विहीत कालावधीत सादर करण्यास कसुर करतील त्यांचेविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 चे कलम 10 क व भारतीय दंड संहिता(IPC) 1860 मधील कलम 171 (I) नुसार कारवाई करण्यात येईल.निवडणुक खर्चाची नोंदवही लेखे तपासणी करतांना लोक उपस्थित राहु शकतील आणि निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्येक पृष्ठाला 1 रुपया प्रमाणे रक्कम प्रदान केल्यावर कोणत्याही व्यक्तीला,कोणत्याही उमेदवारांच्या नोंदवहिची प्रत मिळविता येऊ शकेल.असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.
उमेदवारांने त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीचे सर्व तपशील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविणे आवश्यक असून निवडणुकीचा खर्च निकालाच्या दिवसापर्यंत गणला जाईल. पेड न्यूजसंदर्भात इलेक्ट्रॅानिक तसेच मुद्रित माध्यमे, स्थानिक केबल नेटवर्क तसेच फेसबुक, ट्विटर, बल्क एसएमएस यासारख्या माध्यमांवरही विशेष लक्ष दिले जात आहे.
No comments:
Post a Comment