Monday, April 1, 2019

ईव्हीएम व व्हिव्हिपॅटवरील 'सेटींग' संदर्भात उमेदवारांना माहिती देण्यात येणार


वृ.क्र  169
12-गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ
ईव्हीएम व व्हिव्हिपॅटवरील 'सेटींग' संदर्भात उमेदवारांना माहिती देण्यात येणार
गडचिरोली,दि.01: 12- गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्जतेने कार्यरत असून विविध उपाययोजना करण्यात येत  आहेत. ईव्हीएम व व्हिव्हिपॅट वरील सेटींग संदर्भात उमेदवारांना माहिती देण्यात येत आहे.  कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व व्हिव्हिपॅट वरील उमेदवार सेटींग संदर्भात 67- आरमोरी (एस.टी.), 68- गडचिरोली (एस.
टी.) , 69- अहेरी (एस.टी.) 
- उमेदवारांच्या किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तिंसमोर 2 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान यासंदर्भातील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने दिली आहे.                        
                                                               ****

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यासंदर्भात 5 गुन्ह्यांची नोंद


वृ.क्र  168                                                                                                      दि: 01 एप्रिल 2019

12-गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ
आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यासंदर्भात 5 गुन्ह्यांची नोंद

गडचिरोली,दि.01: 12- गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्जतेने कार्यरत असून विविध उपाययोजना करण्यात येत  आहेत. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यासंदर्भात 5 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.  यामध्ये दारुसाठा , रोख रक्कम बाळगणे, यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे.       
                                                          ******

3740 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण


वृ.क्र  167                                                                                                      दि: 01 एप्रिल 2019
12-गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ
3740 अधिकारी व कर्मचाऱ्यांना  प्रशिक्षण
गडचिरोली,दि.01: 12- गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्जतेने कार्यरत असून विविध उपाययोजना करण्यात येत  आहेत. गडचिरोली जिल्हयातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात मतदानसंबंधी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु आहे.  आरमोरी 1196, अनुपस्थित 8.  गडचिरोली 1384, अनुपस्थित 13, अहेरी 1160, अनुपस्थित 11, एकूण 3740 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले असून 32 जण अनुपस्थित  आढळून आले.  संबंधितांना विहीत कार्यपध्दतीनुसार कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार असल्याची माहिती  जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने दिली आहे.
                                                                        *****

जिल्ह्यात 164 मतदान केंद्रांवर 365 व्हिलचेअर उपलब्ध


वृ.क्र  166                                                                                                     दि: 01 एप्रिल 2019

12-गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ
जिल्ह्यात 164 मतदान केंद्रांवर 365 व्हिलचेअर उपलब्ध

गडचिरोली,दि.01: 12- गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्जतेने कार्यरत असून विविध उपाययोजना करण्यात येत  आहेत. जिल्ह्यात 164 मतदान केंद्रांवर 365 व्हिलचेअर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.  
जिल्ह्यात दिव्यांगाना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी प्रशासन विविध सुविधा पुरवित आहे.  अंध, मुकबधिर, शारिरीक अपंग व इतर दिव्यांगांकरीता 164 मतदान केंद्रांवर 365 व्हिलचेअर उपलब्ध असणार आहेत.  दिव्यांगांना स्वयंसेवकांकडून मतदान केंद्रावर मदत पुरविली जाणार आहे.  यासाठी एन.सी.सी., एन.एस.एस. व स्काऊट गाईड यातील स्वयंसेवकांकडून मदत घेण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर रँम्पची व्यवस्था करण्यात आली आहे.  67-आरमोरी (एस.टी.), अंध 114, मुकबधीर 127, शारिरीक अपंग 427 इतर अन्य 35 असे एकूण 703.  68-गडचिरोली (एस.टी.), अंध 104, मुकबधीर 74, शारिरीक अपंग 469 इतर अन्य 44 एकूण 691.  69- अहेरी (एस.टी.), अंध 113, मुकबधीर 107, शारिरीक अपंग 469 इतर अन्य 93 एकूण 802.  एकूण अंध 351, एकुण मुकबधीर 308, एकूण शारिरीक अपंग 1365, इतर अन्य 172 असे एकूण 2196 दिव्यांग मतदार आहेत.
67- आरमोरी.( एस.टी) मतदान केंद्र 62 व्हिलचेअर संख्या 134, 68- गडचिरोली (एस.टी.) मतदान केंद्र 49, व्हिलचेअर 49, 69- अहेरी (एस.टी.) मतदान केंद्र 53, व्हीलचेअर संख्या 182 एकूण मतदान केंद्र 164, व्हिलचेअर 365. उपलब्ध असल्याची माहिती  जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने दिली आहे.                                                                   ******

आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 'सी व्हिजील' ठरणार उपयुक्त

आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
'सी व्हिजील' ठरणार उपयुक्त
गडचिरोली,दि.01: लोकसभा निवडणूक 2019 दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीचा आढावा घेण्यासाठी तसेच त्रुटी दूर करण्यासाठी "सी व्हिजील "ॲपची निर्मिती भारतीय निवडणूक आयोगाने केली आहे.  पुर्वी आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीची सत्यता तपासून त्यावर कारवाई करताना यंत्रणेची दमछाक होत असे. तसेच सबळ पुराव्या अभावी संबंधितावर कारवाई करताना मर्यादा येत असत. या नवीन ॲपमुळे या त्रुटी आणि मर्यादा कमी होणार आहेत.
सी व्हिजील " हे ॲप निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनासंदर्भात  तक्रार करणाऱ्या नागरिकासाठी एक नाविन्यपुर्ण अस्त्र ठरणार आहे.या माध्यमातून नागरिक स्वतंत्र व नि:पक्षपाती निवडणुकांच्या संचलनासाठी सक्रिय आणि जबाबदार भुमिका बजावू शकतात.  हे ॲप युजर फ्रेंडली असून ॲपचा वापर निवडणुकांच्या अधिसूचनांच्या तारखेपासून मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो.  यातील प्रमुख वैशिष्टये म्हणजे तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हिडिओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे.  कॅमेरा, चांगले इंटरनेट कनेक्शन आणि जिपीएस प्रवेशासह सज्ज असलेल्या कोणत्याही अँड्राईड स्मार्टफोन वरुन या ॲपच्या माध्यमातून आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार करता येऊ शकते.
तीन टप्प्यात होणार तक्रार निवारण
आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे वाटत असल्यास नागरिकांनी त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा दोन तीन मिनिटांचे व्हिडीओ रेकाँर्डिंग करावे.  भौगोलिक माहिती प्रणालीव्दारे (जीपीएस) स्वयंचलीत स्थान मॅपींगसह फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा.  नंतर त्या तक्रारदार नागरिकांच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो.  नागरिक अशा प्रकारे अनेक घटना नोंदवू शकतात.  प्रत्येक अहवालासाठी एक आयडी मिळवू शकतात. सी व्हिजील"  व्दारे आपली ओळख लपऊन सुध्दा तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. यामध्ये मोबाईल क्रमांक आणि इतर प्रोफाईल तपशिल या प्रणालीवर पाठवले जात नाही.  त्यामुळे निनावी तक्रारीबाबत तक्रारकर्त्यास पुढील स्थिती, संदेश मिळणार नाहीत. मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई होणार आहे.  नागरिकांनी तक्रार नोंदवल्यानंतर ती अवघ्या पाच मिनिटातच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होईल.  त्या माहितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एस.एस.टी, व्हि.एस.टी. आणि भरारी पथकाकडे ती माहिती पाठवण्यात येईल.  त्यानुसार संबंधित पथकाकडे ती माहिती पाठविण्यात येईल.  त्यानुसार संबंधित पथकाकडे असणाऱ्या  जीव्हीआयजीआयएल अन्वेषक नामक जीआयएस आधारित मोबाईल ॲप्लीकेशनच्या सहाय्याने जीआयएस संकेत आणि नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन संबंधित पथक  घटनास्थळावर अवघ्या 15 मिनिटाच्या आत पेाहचणे अपेक्षित आहे. 
संबंधित तक्रारीबाबत प्राथमिक तपास आणि तक्रारीतील तथ्यांची तपासणी करुन त्यासंबंधीचा अहवाल ॲपव्दारेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तातडीने पाठविला जाईल.  हा कालावधी 30 मिनिटापेक्षा अधिक नसेल.  त्या तक्रारीत तथ्य आढळले तर  भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविण्यात येईल.  तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या 100 मिनिटाच्या आत तक्रारीची स्थिती तक्रारकत्याला प्राप्त होईल.  त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या  मोबाईलवर तसा संदेश पाठवला जाईल.
                                                                *****

राज्यात २ लाख २४ हजार दिव्यांग मतदार ----- दिव्यांग मतदारांना यंदाची निवडणूक अधिक सुलभ



वृ.क्र  161                                                                                                दि:01 एप्रिल 2019

राज्यात २ लाख २४ हजार दिव्यांग मतदार
दिव्यांग मतदारांना यंदाची निवडणूक अधिक सुलभ

गडचिरोलीदि.01 : राज्यातील दिव्यांग मतदारांना यंदाची लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होणार आहे. दिव्यांगांना मतदानासाठी विविध सुविधा देण्याबरोबरच भारत निवडणूक आयोगाने यंदा त्यांच्यासाठी पीडब्ल्यूडी (PWD) हे नवीन मोबाइल ॲप उपलब्ध करुन दिले आहे. निवडणूक आयोगाने यंदा दिव्यांग मतदारांसाठी ‘सुलभ निवडणुका’ (Accessible Elections) हे घोषवाक्य निश्चित केले आहे.

राज्यात यंदा दिव्यांग मतदारांची संख्या २ लाख २४ हजार १६२ इतकी आहे. यात अंधत्व किंवा कमी दृष्टी असलेले ३७ हजार ३२४मूकबधीर २४ हजार ७७शारीरिक अपंगत्व असलेले १ लाख ८ हजार २२ तर इतर अक्षमता असलेले ५४ हजार ३९ दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांगांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने यंदा मोठा पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात ३ डिसेंबर २०१८ रोजी दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच अपंग कल्याण आयुक्तालय यांचीही या कामी मदत घेण्यात येत आहे. त्यांच्या सहाय्याने यंदा दिव्यांग मतदारांची विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात आली. अपंगांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यातअसे निर्देश निवडणूक आयोगामार्फत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या सर्व सुविधांबाबत निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांना विविध प्रशिक्षणांमध्ये अवगत करण्यात आले आहे. दिव्यांगांना सुविधा देण्यासाठी जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावर सुकाणू समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेशसंख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांगरॅम्प सुविधाअधिक प्रकाश व्यवस्थाव्हील चेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा,दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग आदी सुविधा असणार आहेत. याशिवाय मागणीनुसार मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक व्यवस्था तसेच व्हीलचेअरची सुविधाही प्रशासनामार्फत उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

दिव्यांगांसाठी ॲप

दिव्यांगांची मतदारनोंदणीमतदान केंद्राचा शोधव्हीलचेअरची मागणी इत्यादी सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी पीडब्ल्यूडी (PWD) हे ॲप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे मोबाईल ॲप डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या ॲपवर जाऊन मागणी केल्यास दिव्यांग मतदारांना प्रशासनामार्फत व्हीलचेअर तसेच मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 


-----000-----

आता असणार 'सखी मतदान केंद्र' !


वृ.क्र  161                                                                                                दि:01 एप्रिल 2019

                        आता असणार 'सखी मतदान केंद्र' !

गडचिरोली, दि. 01: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात  'महिला व्यवस्थापित मतदान केंद्रनिर्माण  करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले असून याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच जण महिला असतील. सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रे "सखी मतदान केंद्र" म्हणून ओळखली जाणार आहेत.

लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार असून याला 'सखी मतदान केंद्रअसे म्हटले जाणार आहे.

सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. या सखी मतदान केंद्रात तैनात असलेल्या महिला त्यांच्या आवडीच्या कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान करू शकतात. 'सखी मतदान केंद्रअधिकाधिक आर्कषक आणि सुंदर बनविण्यासाठी रांगोळीरंगरंगोटीसह येथील साफ सफाईवर विशेष भर देण्यात येणार आहे.

'
सखी मतदार केंद्रस्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. सखी मतदार केंद्रावर अधिकारीकर्मचारी  महिला असतील. प्रत्येक मतदारसंघातून  एकाच मतदान केंद्राची निवड होईल. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालयपोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांचीतसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहीलअशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.
-----000-----

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल