वृ.क्र 167 दि: 01 एप्रिल 2019
12-गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ
3740 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
गडचिरोली,दि.01: 12- गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्जतेने कार्यरत असून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गडचिरोली जिल्हयातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात मतदानसंबंधी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. आरमोरी 1196, अनुपस्थित 8. गडचिरोली 1384, अनुपस्थित 13, अहेरी 1160, अनुपस्थित 11, एकूण 3740 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले असून 32 जण अनुपस्थित आढळून आले. संबंधितांना विहीत कार्यपध्दतीनुसार कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने दिली आहे.
No comments:
Post a Comment