वृ.क्र 205
दि:09 एप्रिल 2019
12 - गडचिरोली
- चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघ
महिला, युवक, दिव्यांग व सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे
----- जिल्हाधिकारी शेखर सिंह
गडचिरोली, दि. 9 :- 12 - गडचिरोली - चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल
रोजी मतदानाच्या दिवशी मतदारांनी कोणत्याही
प्रकारच्या आमिषांना बळी न पडता निर्भयपणे मोठया संख्येने मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
राज्यघटनेने आपल्याला मतदान हा मौल्यवान हक्क दिला आहे.
मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त
नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावायलाच हवा असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिकांनी
लवकरात लवकर यावे. शेवटच्या क्षणी मतदान
केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी करण्याचे टाळावे असे आवाहनही करण्यात आले आहे. युवा वर्गाने मोठ्या संख्येने
मतदान करुन इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करावे, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकही मतदार
मतदानापासून वंचित राहू नये यासाठी युवावर्गाने पुढाकार घ्यावा तसेच लोकसभेच्या सार्वत्रिक
निवडणुकीत सर्व महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा. असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
-----000-----
|
Tuesday, April 9, 2019
महिला, युवक, दिव्यांग व सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे ----- जिल्हाधिकारी शेखर सिंह
Subscribe to:
Post Comments (Atom)
12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल
12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल
-
वृ.क्र 2 65 दिनांक: 2 4 मे 2019 (रात्री 2.00 वाजता) 12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकस...
-
12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल
-
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाड ण्याचे निर्देश पोलिस ब...
No comments:
Post a Comment