12-गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी
जिल्हाधिकारी सिंह यांनी साधला व्हाईस कॉलव्दारे संवाद
गडचिरोली,दि.08 : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी आज व्हाईस कॉलव्दारे संवाद साधला.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जिल्हाधिकारी कार्यालयातून एकाचवेळी सुमारे 2.70 लाख नागरिकांना वेळोवेळी एसएमएस पाठविण्याची सुविधा आहे. अशाच प्रकारे व्हाईस एसएमएसचीही सुविधा आहे. याव्दारे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज दिनांक 8 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हाईस एसएमएस व्दारे संवाद साधला. मतदार याद्या अद्यावत करण्यासंदर्भात बुथ लेव्हल अधिकाऱ्यांनी कौतुकास्पद कार्य केले आहे. फोटो व्होटर स्लिपचे वाटपाचे कामही चांगल्या पध्दतीने झाले आहे असे श्री. सिंह यांनी सांगितले. मात्र याबरोबरच मतदारांना निवडणूक आयोगाने निर्देशीत केलेल्या 11 ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहितीही मतदारांपर्यंत पोहचविण्याचे निर्देशही दिले. व त्यांना त्यांच्या कामाविषयी सुचना दिल्या.
No comments:
Post a Comment