Tuesday, April 9, 2019

निवडणूक कामावरील पात्र कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाही




वृ.क्र
   206                                                                                                  दि:09 एप्रिल 2019

निवडणूक कामावरील पात्र कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाही
गडचिरोली, दि. 9 : लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात नियुक्त कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेचे वाटप प्रशिक्षणाच्या आदेशासोबतच करण्यात आले आहे. अर्ज सादर केलेल्या पात्र कर्मचाऱ्यांपैकी कुणीही कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाहीअसे प्रशासनाच्यावतीने  स्पष्ट करण्यात आले आहे.  निवडणूक कामाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकानिवडणूक कार्य प्रमाणपत्राकरिता अर्जाचे नमुने देण्यात येवून हे फॅार्म जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
-----000-----


No comments:

Post a Comment

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल