Monday, April 8, 2019

मतदारांसाठी 'व्हीव्हीपॅट'ची सुविधा




वृ.क्र  192
12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघ
मतदारांसाठी 'व्हीव्हीपॅट'ची सुविधा
                                      गडचिरोली दि 8:-  12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदार संघात 11 एप्रिल रोजी  मतदान होत आहे. मतदारांना वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल 'व्हीव्हीपॅट'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
                                     अपेक्षित उमेदवारालाच आपले मत गेले याची संबंधित मतदारांना खात्री पटावी यासाठी लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट (वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल) मशिनचा वापर करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.  हे मतदानाची पोचपावती देणारे यंत्र आहे. ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रणालीअंतर्गत मतदारासमोर ईव्हीएम युनिट (मतदान यंत्र) आणि व्हीव्हीपॅट यंत्र ठेवलेले असेल. मतदाराने ईव्हीएमवर मतदान केल्यावर 'व्हीव्हीपॅट'वरील पारदर्शी स्क्रीनवर मुद्रित कागदी स्लीप दिसणार आहे. त्यावर अनुक्रमांक, मत दिलेल्या उमेदवाराचे नाव व चिन्ह सात सेकंदांसाठी मतदाराला पाहता येणार आहे. त्यानंतर ही स्लीप व्हीव्हीपॅट यंत्राच्या सीलबंद कप्प्यात पडणार आहे. त्यामुळे मतदाराला मतदानाची खातरजमा करता येणार आहे. शिवाय मतदान यंत्रावर उमेदवारांची छायाचित्रे उपलब्ध असणार आहेत. 
काय आहे व्हीव्हीपॅट - 
मतदानासाठी भारतात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर केला जातो. मतदारांना आपल्या मतदानाबद्दल अधिक विश्वासार्हता निर्माण व्हावी यासाठी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जातो. व्हीव्हीपॅट मशीनच्या माध्यमातून मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिले आहे. ते मत त्याच उमेदवाराला मिळाले की नाही, याची शहानिशा करता येते.
'
व्हीव्हीपॅट' मशीन काम कसे करते - 
मतदार मतदान यंत्राच्या माध्यमातून एखाद्या उमेदवाराला मतदान करतो. त्यावेळी  मतदान कक्षामध्ये मतदान यंत्राच्या बाजुला असलेल्या व्हीव्हीपॅट मशीनमधून उमेदवाराचं नाव, क्रमांक आणि त्यांना दिलेले  चिन्ह यांचा उल्लेख असलेली चिठ्ठी ७ सेकंद पर्यंत मतदाराला दिसते. त्यानंतर ती चिठ्ठी  व्हिव्हिपॅटचे सीलबंद पेटीत जमा होते. व्हीव्हीपॅटवरील चिठ्ठी  एका काचेच्या पेटीत बंद असते. त्यामुळे मतदार ती चिठ्ठी बघू शकतो. मतदाराला व्हीव्हीपॅटला किंवा त्या चिठ्ठीला हात लावता येत नाही.
-----000-----

No comments:

Post a Comment

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल