वृ.क्र 193
12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघ
12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघ
मतदानासाठी मतदारांना विविध सुविधा उपलब्ध
गडचिरोली दि.8:- 12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदार संघात 11 एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी मतदारांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विविध प्रकारच्या मुलभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या माहितीचे फलक लावण्यात येणार आहेत. तसेच ट्रु व्होटर ॲपही उपलब्ध करुन दिला आहे. मतदान केंद्र स्थळी मतदारांना माहिती देण्यासाठी मदत कक्ष उभारण्यात येत आहेत. केंद्राचे ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता गृह, विजेची सोय तसेच तसेच अन्य आवश्यक सुविधा देऊन आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. वृध्द, गरोदर व स्तनदामाता, या मतदारांना मतदानासाठी रांगेत उभे राहावे लागु नये यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि अंध व्यक्तींसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
-----000-----
No comments:
Post a Comment