Monday, April 8, 2019

मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे -- जिल्हाधिकारी शेखर सिंह ----- आरमोरी, गडचिरोली , अहेरी व आमगाव विधानसभा मतदारसंघात सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यत मतदान ब्रम्हपूरी व चिमुर विधानसभा मतदारसंघात सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मतदान



वृ.क्र.191

12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघ
मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे
                                 -- जिल्हाधिकारी शेखर सिंह
आरमोरी, गडचिरोली ,अहेरी व आमगाव  विधानसभा मतदारसंघात सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यत मतदान
ब्रम्हपूरी व  चिमुर विधानसभा मतदारसंघात सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मतदान
     
                           गडचिरोली दि 8:-  12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात
11 एप्रिल रोजी  मतदानाच्या दिवशी  मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता निर्भयपणे  मोठया संख्येने मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
                          राज्यघटनेने आपल्याला मतदान हा सर्वात मौल्यवान हक्क दिला आहे. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा  हक्क बजावायलाच हवा असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
                          मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिकांनी लवकरात लवकर यावे. शेवटच्या क्षणी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी करण्याचे टाळावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
      लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चे अनुषंगाने, 12 गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी, 66-आमगाव  या विधानसभा मतदारसंघात, दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यत मतदान घेण्यात येणार आहे. तसेच 73- ब्रम्हपूरी आणि 74- चिमुर या विधानसभा मतदारसंघात सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजता पर्यंत मतदान करता येईल.
11 एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 करीता दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी  मतदान प्रकीया पार पडणार आहे.  सामान्य प्रशासन विभाग,महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द अधिसूचना दिनांक 27 मार्च 2019 अन्वये 12-गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघात गुरुवार दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
-----000-----

No comments:

Post a Comment

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल