वृ.क्र 211 दि: 10 एप्रिल 2019
12-गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ
निर्भयपणे मतदान करण्यासाठी जिल्हाधिकारी सिंह यांनी साधला
नागरिकांशी व्हाईस कॉलव्दारे संवाद; मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशीही संवाद
गडचिरोली,दि.10 : 12-गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात दिनांक 11 एप्रिल रोजी मतदान होत असून या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील सुमारे 2.50 लक्ष नागरिकांशी मोबाईलवर व्हॅाईस एसएमएस व्दारे संवाद साधुन निर्भयपणे व कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी 4128 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी दिनांक 9 एप्रिल रोजी व्हाईस कॉलव्दारे संवाद साधला. मतदारांना निवडणूक आयोगाने निर्देशीत केलेल्या 11 ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहितीही मतदारांपर्यंत पोहचविण्याचे निर्देशही दिले. व त्यांना त्यांच्या कामाविषयी सुचना दिल्या.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जिल्हाधिकारी कार्यालयातून एकाचवेळी सुमारे 2.70 लाख नागरिकांना वेळोवेळी एसएमएस पाठविण्याची सुविधा आहे. अशाच प्रकारे व्हाईस एसएमएसचीही सुविधा आहे.
No comments:
Post a Comment