Thursday, April 11, 2019

12-गडचिरोली-चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात सरासरी 69 टक्के मतदान ----- रात्री 9.00 वाजता पर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार





12-गडचिरोली-चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात
सरासरी 69 टक्के मतदान
रात्री 9.00 वाजता पर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार            
         
                गडचिरोली दि 11- 12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात रात्री 9.00 वाजतापर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार                       सरासरी 69 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.
12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात सकाळी 7.00 वाजल्यापासून सर्वत्र शांततेत मतदानास सुरुवात झाली.  सर्व मतदान केंद्रावर सुरुवातीला मॉकपोल घेण्यात आले.  95 केंद्रावर वेबकास्टींग करण्यात आले.
एटापल्ली तालुक्यातील कसनसुर जवळील  मौजा  वागेझरी जवळ आईडी ब्लास्ट, गट्टा जांबीया गावाच्या जवळ तसेच पुरसलगोंदी गावाच्या जवळ  झालेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात दोन जवान जखमी झाल्याची घटना घडली. या घटना वगळता  जिल्हयात व मतदारसंघात  अन्यत्र शांततेत मतदान पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमार्फत  देण्यात आली आहे. 
                                                *****
























-----000-----

No comments:

Post a Comment

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल