वृ.क्र 190 दि: 08 एप्रिल 2019
12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघ
मतदान कर्मचा-यांसाठी बसेसची व्यवस्था;
संबंधित कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे
आदेश
गडचिरोली, दि.8: 12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा
मतदारसंघात भामरागड, मूलचेरा, आष्टी, असरअली, सिरोंचा,कसनसूर व एटापल्ली या तहसिल किंवा मुख्य केंद्र ठिकाणाहून
येणा-या मतदान कर्मचा-यांसाठी 9 एप्रिल रोजी 12 बसेसची व्यवस्था अहेरीपर्यंत
येण्यासाठी करण्यात आली आहे. यासाठी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत असे
जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. सर्व संबंधित कर्मचारी यांनी निर्देशीत वेळी
उपस्थित रहावे अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असेही असेही प्रशासनाने
कळविले आहे.
----000-----
No comments:
Post a Comment