सुधारीत बातमी
|
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग, नागपूर
दूरध्वनी - 222194, फॅक्स - 222718 E-Mail: diogadchiroli@gmail.com
|
वृ.क्र 148 दि:26 मार्च 2019
निरिक्षक डॉ.सेल्वराज यांनी
घेतला निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा
कॉम्पलेक्स येथील सर्किट
हाऊसमध्ये मुक्कामी
गडचिरोली,दि.26: 12-गडचिरोली-चिमूर (अ.ज.) लोकसभा मतदार संघातील
निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा निरिक्षक डॉ.सेल्वराज यांनी घेतला व सर्व संबंधीत
नोडल अधिकाऱ्यांना त्यांच्या कामकाजासंदर्भात सूचना दिल्या.
निरिक्षक डॉ.सेल्वराज यांनी निवडणूक
खर्च कक्ष, आचारसंहिता अंमलबजावणी कक्ष,विविध पथके तसेच माध्यम संनियंत्रण व
माध्यम प्रमाणीककरण ( MCMC) कक्षास तसेच माध्यम कक्षासही भेट देऊन पाहणी केली, व सर्व संबंधीत नोडल अधिकाऱ्यांना त्यांच्या
कामकाजासंदर्भात सूचना दिल्या.
निरिक्षक डॉ.सेल्वराज (भा.प्र.से.) यांच्याकडे निवडणूकविषयक कामकाजासंदर्भातील
तक्रारी सकाळी 10.ते 11व सायंकाळी 4 ते 5 (त्यांच्या
उपलब्धतेनुसार) देता येतील.त्यांचा संपर्क क्रमांक 7588721655 असून go.gadchirolichimurpc@gmail.com या ई-मेलवरही तक्रारी नोंदविता
येतील. कॉम्पलेक्स येथील सर्किट हाऊस मधील मार्कंडा यासुट मध्ये डॉ. सेल्वराज
मुक्कामी आहेत.
निवडणूक खर्च निरिक्षक जयंतकुमार लाल (भा.रा.से. ) यांच्याकडे
निवडणूक खर्च विषयक तक्रारी सकाळी 10.ते 11 व सायंकाळी 4 ते 5 (त्यांच्या उपलब्धतेनुसार) देता
येतील.त्यांचा संपर्क क्रमांक 8275237155 असून jayantklal@gmail.com या ई-मेलवरही तक्रारी नोंदविता येतील. कॉम्पलेक्स
येथील सर्किट हाऊसमधील चपराळा या सुटमध्ये निवडणूक खर्च निरिक्षक जयंतकुमार लाल
मुक्कामी आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमार्फत
कळविण्यात आली आहे.
*****
No comments:
Post a Comment