महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग, नागपूर
दूरध्वनी - 222194, फॅक्स - 222718 E-Mail: diogadchiroli@gmail.com
|
वृ.क्र 146
12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदार संघ
6 जणांनी केले अर्ज दाखल
एकूण 10 उमेदवारांचे 18 अर्ज दाखल
गडचिरोली,दि.25: 12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदार संघातील निवडणूकीसाठी आज 6 जणांनी 11 अर्ज दाखल केले आहेत. एकूण आतापर्यंत 10 जणांनी 18 अर्ज सादर केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली.
नामदेव दल्लुजी उसेंडी- इंडियन नॅशनल काँग्रेस, देवराव मोनबा नन्नावरे- आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया , रमेशकुमार बाबुरावजी गजबे - वंचित बहुजन आघाडी, अशोक महादेवराव नेते- भारतीय जनता पार्टी , नामदेव सदाराम किरसान-अपक्ष, नेवारे दामोधर वानुजी- अपक्ष , सुवर्णा बबनराव वरखडे-गोंडवाना गणतंत्र पार्टी, हरीषचंद्र नागोजी मंगाम- बहुजन समाज पार्टी, दिवाकर गुलाब पेंदाम- बहुजन मुक्ती पार्टी व पवन रामचंद्र मगरे- बहुजन समाज पार्टी यांनी आज अर्ज दाखल केले आहेत.
12- गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक अधिसूचना जारी झाली असून आदर्श आचारसंहिता यापुर्वीच लागू झाली आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी 26 मार्च 2019, उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक 28 मार्च 2019 आहे.
जिल्हयात मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. निवडणूकविषयक प्रशिक्षण कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत असून यामध्ये ई-व्ही एम तसेच व्हिव्हीपॅट संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यात 1950 हा टोलफ्री क्रमांक सुरु करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने सी-व्हिजील हे ॲपही निवडणुकीसंदर्भातील तक्रारी मांडण्यासाठी उपलब्ध करुन दिलेले आहे. ****
No comments:
Post a Comment