वृ.क्र.198
गडचिरोली व चंद्रपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हयातील कामगारांना मतदान करण्यासाठी मतदानाच्या दिवशी
सार्वजनिक पगारी सुट्टी जाहीर
गडचिरोली,दि.8 : महाराष्ट्र शासन उद्योग,उर्जा व कामगार विभाग शासन परिपत्रक 15 मार्च 2019 व अधिसूचना 3 मार्च 2019 अन्वये गडचिरोली व चंद्रपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 दिनांक 11 एप्रिल 2019 करिता गडचिरोली जिल्हयातील विविध आस्थापना,कारखाने,निवासी हॉटेल,मॉल्स,दुकाने किंवा इतर आस्थापना अत्यावश्यक सेवा वगळून करीता सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली असून सकाळी 7.00 ते संध्या. 6.00 या वेळात बंद ठेवण्यात याव्यात तसेच त्या दिवशी बंद राहिलेल्या दुकाने आस्थापनातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येवू नये,
अपवादात्मक परिस्थितीत कामगारांना पूर्ण सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल.मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राही.कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान 2 ते 3 तासाची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
वर नमूद केल्यानुसार उद्योग,उर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थपना, कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी व्यवस्थापनाने वरील सूचनाचे येाग्य ते अनुपालन होईल. याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी, मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल.सदर विषयाबाबत आस्थापना अथवा कामगारांना काही अडचणी आल्यास कामगार कार्यालयासी संपर्क साधावे,असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी,गडचिरोली यांनी कळविले आहे.
*******
No comments:
Post a Comment