Monday, April 8, 2019

जिल्ह्यात मतदान केंद्राचे ठिकाणी 144 कलम लागू



वृत्त.क्र 197
जिल्ह्यात मतदान केंद्राचे ठिकाणी  144 कलम लागू

गडचिरोली,दि.8:    भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या 18 मार्च ,2019 च्या अधिसूचना अन्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार ,12 गडचिरोली-चिमूर (अ.ज. ) लोकसभा मतदार संघ , सार्वत्रिक निवडणूक  -2019 करिता मतदान दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी घेणत येणार आहे. 
  जिल्हादंडाधिकारी , गडचिरोली , लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 भयमुक्त व शांततापुर्ण वातावरणत पार पाडण्यासाठी 12 गडचिरोली-चिमूर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघातील गडचिरोली जिल्हयातील सर्व 935 अधिसूचित (Notified) मतदान केंद्राचे 100 मिटरच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144  अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
मतदान केंद्रात प्रवेश करतेवळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती ( निवडणूक संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून ) एकत्रिरित्या प्रवेश करणार नाहीत , मतदान केंद्राच्या 100 मिटरच्या परिसरात सार्वजनिक सभा घेता येणार नाही, मतदान केंद्राचे परीसरात मतदानाचे कालावधीत ध्वनी प्रक्षेपण ( loudspeaker) करणार नाही.  मतदान केंद्राचे परीसरात कोणत्याही प्रकाराच्या घोषणा देता येणार नाहीत. मतदान केंद्राचे परिसरात अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. मतदान केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस /वाहनास प्रवेशास मनाई राहील. मतदान केंद्राचे 100 मिटरच्या परिसरात कोणत्यही राजकीय पक्षास किंवा त्यांचे कार्यकर्त्यास प्रचार व प्रसार करता येणार नाही.
हे आदेश मतदान केंद्रावर काम करणारे अधिकारी/ कर्मचारी, मतदान केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेबाबत त्यांचे कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत. आदेश दिनांक 9 एप्रिल 2019 चे दुपारी 3.00 वाजेपासून ते 11 एप्रिल 2019 चे रात्री 12.00 वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्राचे ठिकाणी अंमलात राहील. असे जिल्हादंडाधिकारी , गडचिरोली यांनी कळविले आहे.
                                    *****

No comments:

Post a Comment

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल