|
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग, नागपूर
दूरध्वनी - 222194, फॅक्स - 222718 E-Mail: diogadchiroli@gmail.com
|
वृ.क्र 161 दि:29 मार्च 2019
दैनंदिन खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर करण्याचे
उमेवारांना निर्देश
गडचिरोली,दि.29 : निवडणूक खर्च
संनियंत्रण सारसंग्रह फेब्रुवारी 2019 अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 77
अन्वेय उमेदवाराने नामनिर्देशन दाखल केल्याचा दिनांक व निकाल जाहिर झाल्याचा
दिनांक या दरम्यानच्या कालावधीतील निवडणूकविषयक सर्व खर्चाच्या नोंदी निवडणूक
निणर्य अधिकारी यांच्याकडुन प्राप्त झालेल्या जोडपत्र ई-1 मध्ये हिशेब ठेवणे
आवश्यक आहे.
उमेदवार
अथवा त्यांचे निवडणुकविषयक प्रतिनिधी यांनी ठेवण्यात आलेली दैनंदिन खर्च नोंदवही
निवडणुक प्रचार मोहिमेच्या कालावधीत किमान तीन वेळा खर्च निरिक्षक यांचेकडे
तपासणीकरीता सादर करावयाची आहे.त्यानुसार 12- गडचिरोली - चिमूर या सार्वत्रिक
लोकसभा निवडणुक 2019 करीता उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी दिनांक 1
एप्रिल 2019,दिनांक 5 एप्रिल 2019 व दिनांक 9 एप्रिल 2019 रोजी सकाळी 10.00 ते
सांयकाळी 5.00 वाजेपर्यत आपल्याकडील दैनंदिन खर्च नोंदवही,मुळ देयके व प्रमाणक
तसेच खर्चाच्या वर्णनाची संक्षिप्त टिपणीसह निश्चित केलेल्या दिनांक व वेळेस खर्च
निरिक्षक यांचकडे सादर करावीत.
तसेच
जे उमेदवार खर्चविषयक लेखे विहीत कालावधीत सादर करण्यास कसुर करतील त्यांचेविरुध्द
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 चे कलम 10 क व भारतीय दंड संहिता (IPC) 1860 मधील कलम 171
(I) नुसार
कारवाई करण्यात येईल.निवडणुक खर्चाची नोंदवही लेखे तपासणी करतांना लोक उपस्थित
राहु शकतील आणि निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्येक पृष्ठाला 1 रुपया प्रमाणे
रक्कम प्रदान केल्यावर कोणत्याही व्यक्तीला,कोणत्याही उमेदवारांच्या नोंदवहिची
प्रत मिळविता येऊ शकेल.असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली
यांनी कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment