|
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग, नागपूर
दूरध्वनी - 222194, फॅक्स - 222718 E-Mail: diogadchiroli@gmail.com
|
वृ.क्र 127 दि: 11 मार्च 2019
आदर्श आचार संहिताचे पालन करणे
ही सर्वांची जबाबदारी
मतदारांवर प्रभाव पडणार नाही, याची काळजी घ्या
-जिल्हाधिकारी शेखर सिंह
जिल्हाधिकारी कार्यालयात
विभाग प्रमुखांची बैठक
गडचिरोली,दि.11:- लोकसभा निवडणुकीमध्ये शासकीय
यंत्रणेने अतिशय तटस्थपणे पूर्ण प्रकिया पार पाडायची असते. मतदानावर व मतदारावर
प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही घटनाक्रमाला संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्थान न देणे
म्हणजेच आदर्श आचारसंहितेचे पालन करणे होय,अशा सुचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
आगामी
लोकसभा 2019 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हधिकारी कार्यालय गडचिरोली येथे आदर्श आचार सहिंतेची अंमलबजावणी संबंधाने
सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
निवडणुकीच्या संदर्भात गठित
करण्यात आलेल्या सर्व समित्यांचे प्रमुख देखील या बैठकीला हजर होते. यावेळी
प्रामुख्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेष
बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी दामोधर
नान्हे, निवडणूक उपजिल्हाधिकारी कल्पना निळ दुबे, नायबतहसिलदार सुनिल चडगुलवार,
बालाजी सोपनकर, भांडारकर प्रामुख्याने
उपस्थित होते.
मुख्य कार्यपालन अधिकारी
डॉ. राठोड यांनी निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन कशा प्रकारे करायचे
याबाबतचे मार्गदर्शन सादरीकरणाव्दारे केले. एकदा आचारसहिता अंमलात आली की, अधिकाऱ्यांनी
अतिशय काटेकोरपणे व नियमानुसार आपल्या अधिकाराचे पालन करणे निवडणूक काळामध्ये
अतिशय आवश्यक असून उपलब्ध असणाऱ्या कायद्याचे प्रभावी वापर करणे गरजेचे असल्याचे
स्पष्ट केले.
निवडणूक काळामध्ये दिलेल्या
जबाबदाऱ्या पार पाळणे,पदाधिकाऱ्याकडून शासकीय यंत्रणेचा वापर होऊ न देणे, मतदारांवर
प्रभाव पाडणाऱ्या प्रचार साहित्यांबाबत
दक्षता घेणे,वाहनांचा योग्य वापर करणे किती गरजेचे असते, हे आचारसंहितेतील
नियमांचे दाखला देत त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्हा पोलिस अधिक्षक बलकवडे यांनीही यावेळी निवडणूक काळात आचार सहिंतेचे पालन
करतांना कायम पुढे येणारे प्रश्न व त्यांचे निराकरण याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना याबाबतची
माहिती देण्यात आली. मतदान पारदर्शी व निष्पक्षपणे कसे होणार याचे प्रात्यक्षिक
देखील यावेळी सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले. नागरिकांच्या सर्व शंकाचे समाधान
करण्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी
आदर्श आचारसंहितेचे पालन करताना जिल्ह्यामध्ये कुठलीही अनुचित घटना घडणार
नाही.यासाठी सर्वानी काळजी घेण्याचे आवाहन केले.
यासोबतच निवडणूक वेबसाईटवर
असणारी माहिती व वेळोवेळी निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी
प्रत्यकाने करण्याबाबत निर्देश दिले.यावेळी निवडणूक आयोगातर्फे ॲप देखील सुरु
करण्यात आले असून,निवडणुकीच्या काळामध्ये सामान्य जनतेला देखील निष्पक्ष निवडणूक
होण्यासाठी नवे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे.याबाबतचीही माहिती त्यांनी
यावेळी दिली.
12-गडचिरोली-चिमूर
लोकसभाक्षेत्रात सहा विधानसभाक्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये 66-आमगाव, 67-आरमोरी,
68- गडचिरोली, 69- अहेरी, 73- ब्रम्हपूरी, 74 - चिमूर अंतर्भुत होतात. या लोकसभा निर्वाचन क्षेत्रात पुरुष मतदार 7
लाख 94 हजार 768 तर महिला मतदार 7 लाख 73 हजार 850 असे एकूण 15 लाख 68 हजार 620
मतदार आहेत.
बैठकीला जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी
निवडणूकीसंबंधी माहिती घेण्यासाठी
जिल्ह्यात 1950 हा टोल फ्रि क्रमांक सुरु करण्यात आला असून,सकाळी 9 ते सांय.9 या
काळात कोणत्याही मोबाईल व फोनवरुन हा क्रमांक डायल करता येतो. त्यामुळे या टोल
फ्री क्रमांकाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, सर्व अधिकाऱ्यांनी 1950 या टोल फ्री क्रमाकांची माहिती यंत्रणेला द्यावी व सर्वानी
या यंत्रणेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करावे तसेच या निवडणूकीत मतदारांनी निर्भयपणे
मतदान करावे असेही आवाहन जिल्हा निवडणूक
अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी
केले.
*****
No comments:
Post a Comment