|
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग, नागपूर
दूरध्वनी - 222194, फॅक्स - 222718 E-Mail: diogadchiroli@gmail.com
|
वृ.क्र 118 दि: 1 मार्च 2019
मतदार यादी विशेष
संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम
गडचिरोली,दि.1: भारत निवडणूक आयोगानी 1
जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार
यादीचे विशेष संक्षिप्त
पुनरिक्षणाचे काम दिनांक 1 सप्टेंबर, 2018
पासुन सुरु करण्यात आले असून दिनांक 31 ऑक्टोंबर 2018 या कालावधित
राबविण्यात आला. यामध्ये मतदारांकडुन मतदार नोंदणी / वगळणी / स्थलांतरण / व
दुरुस्ती संबधाने दावे/ हरकती प्राप्त करुन घेण्यात येऊन दिनांक 31 जानेवारी 2019
रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कालावधीत राबविण्यात आलेल्या मतदार
नोंदणी कार्यक्रमात नाव नोंदणीपासुन वंचीत असलेल्या व्यक्तींना त्यांचे नावे मतदार
यादीत समाविष्ट करण्यास संधी देण्यास दिनांक 2 ,व 3 मार्च 2019 रोजी मतदार नोंदणीची विशेष मोहिम
राबविण्यात येत आहे. उपरोक्त तारखांना सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय
अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता हे उपस्थीत राहून मतदार यादीचे वाचन
करण्यात येणार आहे.तसेच मतदार नोंदणी
वगळणी स्थलांतरण दुरुस्ती संबंधाने नुमना-6.6-अ,7,8 व 8-अ फार्म स्विकारणार आहेत.करीता नागरीकांनी त्यांचे नावे
मतदार यादीत असल्याची खात्री करुन घेण्यासाठी,व ज्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट
झालेले नाही त्यांनी नाव नोंदणीकरीता अर्ज भरुन देण्यास विशेष मोहीमेत सहभागी होऊन
कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांचेकडून करण्यात येत
आहे.
0000000
No comments:
Post a Comment