|
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग, नागपूर
दूरध्वनी - 222194, फॅक्स - 222718 E-Mail: diogadchiroli@gmail.com
|
वृ.क्र 154 दि:28 मार्च 2019
12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदार संघ
1 उमेदवारी अर्ज मागे
5 उमेदवार निवडणूक लढविणार
गडचिरोली,दि.28: 12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघातील
निवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या दिवशी डॉ. किरसान एन.डी.- अपक्ष यांनी
आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून 5 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने
कळविले आहे.
12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघातील
निवडणूक लढविणारे
उमेदवार-
(एक) राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय
पक्षांचे उमेदवार-
अशोक महादेवराव नेते- कन्नमवार वार्ड नं.23, चामोर्शी रोड,
गडचिरोली ता.जि. गडचिरोली- भारतीय जनता पार्टी . दिलेले चिन्ह- कमळ, डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी- यशोधरा निवास , शिवाजी नगर कॅम्प
एरिया,गडचिरोली ता.जि. गडचिरोली- इंडियन नॅशनल काँग्रेस. दिलेले चिन्ह- हात,
हरीचंद्र नागोजी मंगाम- मु.इल्लुर पो. ठाकरी, ता.चामोर्शी जि.गडचिरोली - बहुजन
समाज पार्टी. दिलेले चिन्ह- हत्ती,
(दोन) नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व
राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार)
देवराव मोनबा नन्नावरे- राजीव गांधी वार्ड,क्र. 4 वडाळा (पैकू ) ता. चिमूर जि.चंद्रपूर-आंबेडकराईट
पार्टी ऑफ इंडिया. दिलेले चिन्ह-कोट, डॉ. रमेशकुमार बाबुरावजी गजबे-मु.पो.भिसी,
ता.चिमूर जि.चंद्रपूर, वंचित बहुजन आघाडी.
दिलेले चिन्ह- कप आणि बशी,
जिल्हयात मतदार जागृती
कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. निवडणूकविषयक प्रशिक्षण कार्यक्रमांचेही आयोजन
करण्यात येत असून यामध्ये ई-व्ही एम तसेच व्हिव्हीपॅट संदर्भात प्रशिक्षण देण्यात
येत आहे. जिल्ह्यात 1950 हा टोलफ्री
क्रमांक सुरु करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने सी-व्हिजील हे ॲपही
निवडणुकीसंदर्भातील तक्रारी मांडण्यासाठी उपलब्ध करुन दिलेले आहे.
******
No comments:
Post a Comment