वृ.क्र ---377 दि:03 एप्रिल 2019
| ||
गडचिरोली दि 3 : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात नव्याने दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रे वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात एकूण 97 हजार 640 मतदान केंद्रे असणार आहेत.
12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात- 66- आमगाव (अ.ज)-310, 67-आरमोरी (अ.ज)-294, 68-गडचिरोली (अ.ज)-346, 69- अहेरी (अ.ज)- 290, 73-ब्रम्हपुरी-323, 74- चिमूर-308 एकुण 1871 मतदान केंद्र आहेत. 10 सहाय्यकारी मतदान केंद्र प्रस्तावित आहेत.
विशेष म्हणजे नाशिकमध्ये 274 वाढीव मतदान केंद्रे, पुण्यामध्ये 237 आणि ठाण्यामध्ये 227 वाढीव मतदान केंद्रे असणार आहेत. मात्र सिंधुदुर्गमध्ये एकही वाढीव मतदान केंद्र नसेल.
साधारणपणे 1 हजार 400 मतदारांमा
2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्रे होती. तर 2009 मध्ये एकूण 83 हजार
मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिद्धी, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदार केंद्रांची 'संवेदनशीलता' बघून त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 15 प्रकारच्या मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.
-----000-----
|
Wednesday, April 3, 2019
राज्यात आता एकूण ९७ हजाराहून अधिक मतदान केंद्रे ----- 12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात 1871 मतदान केंद्र
माध्यमांचा प्रचारासाठी गैरवापर करणाऱ्यांवर 'एमसीएमसी'ची करडी नजर
वृ.क्र ---376
माध्यमांचा प्रचारासाठी गैरवापर करणाऱ्यांवर 'एमसीएमसी'ची करडी नजर
| |||
गडचिरोली दि 3 : प्रसारमाध्यमांचा प्रचारासाठी गैरवापर होवू नये यासाठी जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमार्फत करडी नजर ठेवण्यात येत आहे. जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती कक्ष यासाठी कार्यरत आहे. जिल्हा प्रशासनाने आदर्श आचारसंहितेचा भंग होवू नये व प्रसारमाध्यमांचा प्रचारासाठी गैरवापर करणाऱ्यांवर तसेच विनापरवानगी प्रचार करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या बातम्या, लेख तसेच समाजमाध्यमांतील व्हॉट्सअॅप ग्रुपवरील विनापरवानगी पोस्ट, मोबाईलद्वारे एसएमएस, बल्क एसएमएस अथवा प्रचार करणाऱ्या तसेच अशा प्रकारच्या सेवा पुरवविणाऱ्या एजन्सीना नोटीस बजाऊन कडक कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत. फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम, युट्युब, व्हॉट्सअप या समाजमाध्यमातून आक्षेपार्ह मजकूर अथवा ऑडिओ, व्हीडिओ क्लिप, संदेशातील मजकूर यासंदर्भातही समितीमार्फत करडी नजर ठेवण्यात येत आहे.
-----000-----
|
Tuesday, April 2, 2019
09 'महिला व्यवस्थापित मतदान केंद्र'
वृ.क्र 175
| |||
09 'महिला व्यवस्थापित मतदान केंद्र'
गडचिरोली दि 02 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता 09 'महिला व्यवस्थापित मतदान केंद्र' निर्माण करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले असून याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच जण महिला असतील. सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रे "सखी मतदान केंद्र" म्हणून ओळखली जाणार आहेत.
67- आरमोरी विधानसभा मतदार संघांतर्गत शहरी भागात मतदान केंद्रांचे क्रमांक व नाव - 114- देसाईगंज ( भगतसिंग वार्ड), मतदान केंद्राचा पत्ता, नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा नविन इमारत, भगतसिंग वार्ड देसाईगंज. एकूण मतदार- 941 या मतदान केंद्राची महिला पथकाकरिता निवड करण्यात आली आहे.
74- चिमूर विधानसभा मतदार संघाकरिता मतदान केंद्र क्रमांक 179 अ चिमूर (प्रस्तावित सहाय्यकारी मतदान केंद्र) नेहरु विद्यालय चिमूर, खोली क्रमांक -1 , मतदार क्षेत्र कवडशी रोडी, नेताजी वार्ड, चिमूर हे महिला मतदान केंद्र म्हणून स्थापन करण्यात येत आहे.
73- ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघाकरिता मतदान केंद्र क्रमांक 18- ब्रम्हपूरी. मतदान केंद्राचे नाव -पंचायत समिती कार्यालयातील सभागृह, ब्रम्हपूरी. 22- ब्रम्हपुरी. मतदान केंद्राचे नाव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक -1 (पश्चिमेकडील भाग) ब्रम्हपुरी.
66- आमगाव विधानसभा मतदारसंघात कुंभारटोली येथे झेङ पी. ज्युनिअर कॉलेज, आमगाव पुर्वेकडील खोली क्रमांक 2, आमगावखुर्द- जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा आमगाव खुर्द, खेाली क्रमांक 3. देवरी- जिल्हा परिषद मुलींची मराठी व हिंदी प्राथमिक शाळा देवरी खोली क्रमांक 4 येथे महिला मतदान केंद्र स्थापन करण्यात येत आहे.
68-गडचिरोली मतदारसंघात 83- गडचिरोली मतदान केंद्र, पंचायत समिती कार्यालय (बचत भवन) गडचिरोली येथे महिला मतदान केंद्र स्थापन करण्यात येत आहे.
69-अहेरी 30- विवेकानंदपूर, शासकीय आश्रमशाळा, विवेकानंदपूर रुम नं. 2 मुलचेरा येथे महिला मतदान केंद्र स्थापन करण्यात येत आहे.
आरमोरी विधानसभा मतदारसंघात सहाय्यकारी मतदान केंद्र --- गडचिरोली विधानसभा मतदारसंघात 3 मतदान केंद्रांत बदल
वृ.क्र 174
| |||
आरमोरी विधानसभा मतदारसंघात सहाय्यकारी मतदान केंद्र
गडचिरोली विधानसभा मतदारसंघात 3 मतदान केंद्रांत बदल
गडचिरोली दि 02 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता सहाय्यकारी मतदान केंद्राच्या प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
सहाय्यकारी मतदान केंद्र- 67 आरमोरी विधानसभा मतदार संघ-
अ.क्र.
|
मतदान केंद्राचे नाव व मतदान केंद्र
|
मतदान केंद्रांचा पत्ता
|
मतदान केंद्र प्रकार
|
1
|
33- कुरखेडा
|
जि.प.उच्चश्रेणी प्राथमिक केंद्र शाळा कुरखेडा खोली क्रमांक 1
|
मुळ मतदान केंद्र
|
2
|
33 अ- कुरखेडा
|
जि.प.उच्चश्रेणी प्राथमिक केंद्र शाळा कुरखेडा खोली क्रमांक 3
|
सहाय्यकारी मतदान केंद्र
|
3
|
67- कोरची
|
जि.प.उच्चश्रेणी प्राथमिक केंद्र शाळा कोरची खोली क्रमांक 2
|
मुळ मतदान केंद्र
|
4
|
67 अ- कोरची
|
जि.प.उच्चश्रेणी प्राथमिक केंद्र शाळा कोरची खोली क्रमांक 3
|
सहाय्यकारी मतदान केंद्र
|
5
|
110- देसाईगंज (तुकूम वाडी)
|
नगर परिषद नगर भवन, फवारा चौक, चौकीदार क्वार्टर मागील बाजू देसाईगंज
|
मुळ मतदान केंद्र
|
6
|
110 अ- देसाईगंज (तुकूम वाडी)
|
नगर परिषद नगर भवन, फवारा चौक, चौकीदार क्वार्टर मागील बाजू देसाईगंज
|
सहाय्यकारी मतदान केंद्र
|
7
|
115- देसाईगंज(किदवाई वाडी)
|
न.प. मराठी प्राथमिक शाळा देसाईगंज (नवीन इमारत) भगतसिंग वार्ड, खोली क्रमांक -2
|
मुळ मतदान केंद्र
|
8
|
115 अ - देसाईगंज(किदवाई वाडी)
|
न.प. मराठी प्राथमिक शाळा देसाईगंज (नवीन इमारत) भगतसिंग वार्ड, खोली क्रमांक -3
|
सहाय्यकारी मतदान केंद्र
|
9
|
119 देसाईगंज (वडसावाडी)
|
न.प. मराठी प्राथमिक शाळा देसाईगंज, जुनी वडसा खोली क्रमांक -1
|
मुळ मतदान केंद्र
|
10
|
119 अ -देसाईगंज (वडसावाडी)
|
न.प. मराठी प्राथमिक शाळा देसाईगंज, जुनी वडसा खोली क्रमांक -2
|
सहाय्यकारी मतदान केंद्र
|
68- गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदान संघ
इमारत बदल झालेल्या मतदान केंद्रांची यादी
अ.क्र.
|
यादी भाग क्रमांक
|
मतदान केंद्राचा पुर्वीचा पत्ता
|
मतदान कंद्रांचा नवीन पत्ता
|
79-
|
79-गडचिरोली
|
नगरपरिषद प्राथमिक शाळा, लांझेडा, गडचिरोली, खोली क्रमांक 3
|
अंगणवाडी केंद्र क्रमांक -7 लांजेडा वार्ड
|
80-
|
80-गडचिरोली
|
नगरपरिषद प्राथमिक शाळा, लांझेडा, गडचिरोली, खोली क्रमांक 4
|
अंगणवाडी केंद्र क्रमांक -210 लांजेडा वार्ड
|
306-
|
306- वायगाव रै.
|
जिल्हा परिषद उच्च प्राथमि शाळा, वायगाव, रै.
|
ग्रामपंचायत कार्यालय, वायगाव
|
Subscribe to:
Posts (Atom)
12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल
12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल
-
वृ.क्र 2 65 दिनांक: 2 4 मे 2019 (रात्री 2.00 वाजता) 12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकस...
-
12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल
-
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाड ण्याचे निर्देश पोलिस ब...