वृ.क्र ---376
माध्यमांचा प्रचारासाठी गैरवापर करणाऱ्यांवर 'एमसीएमसी'ची करडी नजर
| |||
गडचिरोली दि 3 : प्रसारमाध्यमांचा प्रचारासाठी गैरवापर होवू नये यासाठी जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमार्फत करडी नजर ठेवण्यात येत आहे. जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती कक्ष यासाठी कार्यरत आहे. जिल्हा प्रशासनाने आदर्श आचारसंहितेचा भंग होवू नये व प्रसारमाध्यमांचा प्रचारासाठी गैरवापर करणाऱ्यांवर तसेच विनापरवानगी प्रचार करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या बातम्या, लेख तसेच समाजमाध्यमांतील व्हॉट्सअॅप ग्रुपवरील विनापरवानगी पोस्ट, मोबाईलद्वारे एसएमएस, बल्क एसएमएस अथवा प्रचार करणाऱ्या तसेच अशा प्रकारच्या सेवा पुरवविणाऱ्या एजन्सीना नोटीस बजाऊन कडक कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत. फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम, युट्युब, व्हॉट्सअप या समाजमाध्यमातून आक्षेपार्ह मजकूर अथवा ऑडिओ, व्हीडिओ क्लिप, संदेशातील मजकूर यासंदर्भातही समितीमार्फत करडी नजर ठेवण्यात येत आहे.
-----000-----
|
Wednesday, April 3, 2019
माध्यमांचा प्रचारासाठी गैरवापर करणाऱ्यांवर 'एमसीएमसी'ची करडी नजर
Subscribe to:
Post Comments (Atom)
12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल
12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल
-
वृ.क्र 2 65 दिनांक: 2 4 मे 2019 (रात्री 2.00 वाजता) 12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकस...
-
12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल
-
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाड ण्याचे निर्देश पोलिस ब...
No comments:
Post a Comment