Wednesday, April 3, 2019

आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे ------ जिल्हाधिकारी शेखर सिंह


वृ.क्र  ---378                                                                                             दि:03 एप्रिल 2019

आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे
                       ------ जिल्हाधिकारी शेखर सिंह
          गडचिरोली दि 3 : सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (एआरओ) यांनी समन्वयाने काम करुन जिल्ह्यातील कोणत्याही भागात अनुचित प्रकार होऊ नये यासाठी निवडणूक आचारसंहिता कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियमांचे कठोरपणे पालन करावेअसे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
               निवडणूक प्रचारासाठी संबंधितांनी प्रशासकीय परवानगी घेतलेली असणे अत्यावश्यक असून कोणतीही विनापरवानगी प्रचारसभा होणार नाही तसेच विनापरवानगी निवडणूक प्रचाराचे वाहन असणार नाही याची दक्षता त्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. शांतता भंग करणाऱ्या घटना रोखण्यासाठी सतर्क राहून बेकायदेशीर बाबींना अटकाव केला जावा. एसएसटी आणि एफएसटी या निवडणूक निगराणी पथकांच्या वतीने होत असलेल्या कारवाईचा आढावा घेऊन संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.
-----000-----

No comments:

Post a Comment

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल