Sunday, April 7, 2019

निवडणूक निरीक्षक डॉ सेल्वराज यांनी घेतला कामकाजाचा आढावा







निवडणूक निरीक्षक डॉ सेल्वराज यांनी घेतला कामकाजाचा आढावा
                    गडचिरोली दि 7:- निवडणूक निरीक्षक डॉ सेल्वराज यांनी गडचिरोली व ब्रह्मपुरी  येथे
निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा घेतला व सर्व नोडल अधिकारी यांना त्यांच्या कामाविषयी
निर्देश दिले.
यावेळी  उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व अन्य नोडल अधिकारी उपस्थित होते. 
                   निवडणूक निरीक्षक डॉ सेल्वराज यांनी गडचिरोली येथील काही मतदान केंद्रांची पाहणी करून संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.  निवडणूक प्रक्रियेसाठी स्थापन करण्या आलेल्या विविध कक्षांनाही  निवडणूक निरिक्षक  डॉ.सेल्वराजयांनी  यांनी भेट देऊन पाहणी  केली. निवडणूक  प्रक्रियेतील आदर्श आचारसंहिता, निवडणूक खर्चसंनियंत्रण 
कक्ष, मतदान केंद्र, निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम, मतदार  मतदा जागृती कार्यक्रम, वाहन व्यवस्था, कायदाआणि सुव्यवस्था, लेक्ट्रॅानिक व्होटींग मशीन्सची उपलब्धता, मतमोजणी केंद्र  प्रक्रिया यासंदर्भातील कामकाजाचा तसेच मतदानाची क्केवारी, याबाबतही आढावा घेतला. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्या यावे, निवडणूकीशी संदर्भित विविध कायदे  अधिनियम यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्या यावी तसेच निर्भय  निष्पक्ष वातावरणातनिवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे निर्देशही यावेळी निवडणूक निरिक्षक डाॅ सेल्वराज यांनी  दिले.
लोकसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्चसंनियंत्रण कक्षाची करडी नजर सून प्रत्येक खर्चाचा तपशील कक्षाला कळविणे बंधनकारक आहे. उमेदवाराने आपल्याखर्चाचे दैनंदिन लेखे विहीत नमुन्यात ठेवणे, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी कोणतीही सभा अथवा पदयात्रेची  परवानगीमागताना संभाव्य खर्चाचा आराखडा सादर करणे आवश्यक आहे. प्रचार साहित्यावर फक्त विशिष्ट पक्षाचे चिन्ह असेल तरअसा र्च त्या संबंधित पक्षाच्या खर्चामध्ये समाविष्ट केला जाईल. परंतु जर प्रचार साहित्यावर उमेदवाराचा फोटो, नावअसेल तर तो खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाईल. 
उमेदवारांने त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीचे सर्व तपशीलजिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविणे आवश्यक असून निवडणुकीचा खर्च निकालाच्या दिवसापर्यंत गणलाजाईल. पेड न्यूजसंदर्भात इलेक्ट्रॅानिक तसेच मुद्रित माध्यमे, स्थानिक केबल नेटवर्क तसेच फेसबुक, ट्विटर, बल्कएसएमएस यासारख्या माध्यमांवरही विशेष लक्ष दिले जात असल्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

-------000---

No comments:

Post a Comment

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल