Thursday, April 4, 2019

दिव्यांग मतदारांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश

वृ.क्र  -178                                                                                              दि:04 एप्रिल 2019
12-गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ

दिव्यांग मतदारांना आवश्यक सोईसुविधा
उपलब्ध करुन देण्याचे निर्देश
गडचिरोली दि 4 : दिव्यांग व्यक्तींना मतदान प्रक्रिया सहजसुलभ व्हावीत्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग मोठ्या संख्येने वाढावा. याकरीता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढला पाहिजे. त्यांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहन व्यवस्थासहाय्यकाची आवश्यकता भासणार असल्यास तशी व्यवस्था करण्यात यावी. मतदान केंद्रावर रॅम्पपिण्याचे पाणीमदत कक्ष आदी व्यवस्थेसह दिव्यांग मतदारांना मतदानाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्य़ात असे निर्द्शही देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात 164 मतदान केंद्रांवर 365 व्हिलचेअर उपलब्ध

गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्जतेने कार्यरत असून विविध उपाययोजना करण्यात येत  आहेत. जिल्ह्यात 164 मतदान केंद्रांवर 365 व्हिलचेअर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.  
जिल्ह्यात दिव्यांगाना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी प्रशासन विविध सुविधा पुरवित आहे.  अंधमुकबधिरशारिरीक अपंग व इतर दिव्यांगांकरीता 164 मतदान केंद्रांवर 365 व्हिलचेअर उपलब्ध असणार आहेत.  दिव्यांगांना स्वयंसेवकांकडून मतदान केंद्रावर मदत पुरविली जाणार आहे.  यासाठी एन.सी.सी.एन.एस.एस. व स्काऊट गाईड यातील स्वयंसेवकांकडून मदत घेण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर रँम्पची व्यवस्था करण्यात आली आहे.  67-आरमोरी (एस.टी.)अंध 114मुकबधीर 127शारिरीक अपंग 427 इतर अन्य 35 असे एकूण 703.  68-गडचिरोली (एस.टी.)अंध 104मुकबधीर 74शारिरीक अपंग 469 इतर अन्य 44 एकूण 691.  69- अहेरी (एस.टी.)अंध 113मुकबधीर 107,शारिरीक अपंग 469 इतर अन्य 93 एकूण 802.  एकूण अंध 351एकुण मुकबधीर 308एकूण शारिरीक अपंग 1365इतर अन्य 172 असे एकूण 2196 दिव्यांग मतदार आहेत.
67- आरमोरी.( एस.टी) मतदान केंद्र 62 व्हिलचेअर संख्या 13468- गडचिरोली (एस.टी.) मतदान केंद्र 49व्हिलचेअर 4969- अहेरी (एस.टी.) मतदान केंद्र 53,व्हीलचेअर संख्या 182 एकूण मतदान केंद्र 164व्हिलचेअर 365. उपलब्ध असल्याची माहिती  जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने दिली आहे. 
                                              ******************

No comments:

Post a Comment

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल