वृ.क्र.211 दिनांक: 9 एप्रिल 2019
जिल्हयात 11 एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद
गडचिरोली,दि.9:- 12 गडचिरोली -चिमूर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात , सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता मतदान दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी घेण्यात येणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, या करिता शासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. मतदानाच्या दिवशी जिल्हयातील अनेक गांवामध्ये आठवडी बाजार आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी ठिकठिकाणी नागरीकांच्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सार्वजनिक निवडणूकीचे दिवशी तालुक्यातील / गावातील भरणारे आठवडी बाजार /जत्रा बंद ठेवण्याचे अथवा पुढे ढकलण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी दिले आहेत.
******
No comments:
Post a Comment