|
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग, नागपूर
दूरध्वनी - 222194, फॅक्स - 222718 E-Mail: diogadchiroli@gmail.com
|
वृ.क्र 135 दि: 18 मार्च 2019
कोणत्याही प्रकारच्या आमिषांना
बळी न पडता निर्भयपणे मतदान
करावे
-जिल्हाधिकारी
शेखर सिंह
गडचिरोली,दि.18: 12-चिमूर-गडचिरोली
लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या
आमिषांना बळी न पडता निर्भयपणे मतदान
करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) कल्पना नीळ या
उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, 12-चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघात निवडणूक
अधिसूचना जारी झाली आहे. आदर्श
आचारसंहितेची अंमलबजावणी यापुर्वीच लागू झाली असून आचारसंहितेची अंमलबजावणी अत्यंत
कडकपणे करण्यात येणार आहे. मतदारांनी दारु, पैसे किंवा कोणत्याही स्वरुपातील
भेटवस्तू अशा कोणत्याही प्रकारच्या
आमिषांना बळी न पडता निर्भयपणे मतदान
करण्याचे आवाहन श्री. सिंह यांनी केले.
नामनिर्देशनपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यापासून 6 उमेदवारांनी
उमेदवारी अर्ज घेतले आहेत. प्रत्येक
विधानसभा मतदारसंघात 1 महिला विशेष मतदान
केंद्र राहणार
आहे.
मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. निवडणूकविषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात येत असून यामध्ये ई-व्ही एम तसेच व्हिव्हीपॅट संदर्भात प्रशिक्षण देण्यात
येत आहे. जिल्ह्यात 1950 हा टोलफ्री
क्रमांक सुरु करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने सी-व्हिजील हे ॲपही
निवडणुकीसंदर्भातील तक्रारी मांडण्यासाठी उपलब्ध करुन दिलेले आहे. महिलांना तसेच अपंग व्यक्तीना मतदानाचा हक्क
बजावता यावा यावर भर देण्यात येत असून मतदानासाठी दिव्यांग व्यक्तीनीं वाहनाच्या
मदतीची मागणी केल्यास त्यानुसार ते पुरविण्यात येईल. अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
7,69,746 एकूण मतदार असून यामध्ये 3,90,946 पुरुष मतदार तर 3,78,498 महिला
मतदार आहेत. मतदान केंद्राची संख्या 930
असून ग्रामीण भागात 777 तर शहरी भागात 153 मतदान केंद्र असल्याची माहितीही यावेळी
देण्यात आली.
****
No comments:
Post a Comment